रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील राजिवडा येथे लोखंडी रॉडने मारहाण करुन दुखापत कऱणाऱ्या चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात पुरस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफरात मोहम्मदशरीफ फणसोपकर (27, रा. राजिवडा-रत्नागिरी) इमरान अब्बास फणसोपकर (38), वासिम मुल्ला ( 40, दोघेही रा. राजिवडा-रत्नागिरी) व फैजान रियाज फणसोपकर (23, राजिवडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.
ही घटना मंगळवार 10 फेब्रुवारी रोजी रात्री 11.वा सुमारास राजिवडा येथे घडली. फिर्यादी फैजान रियाज फणसोपकर (23, रा. राजिवडा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या शेजारी वासीम मुल्ला याचा मुलगा अफान मुल्ला याचे व फिर्यादी यांचे शनिवार 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वा. वाद झाला होता. फिर्यादी हे मंगळवारी रात्री 9 वा. सुमारास राजिवडा पुलाजवळून येत असताना संशयित वासिम मुल्ला याने तू कोठे जातोस विचारुन फिर्यादीची चेष्टा केली. त्यावर चेष्टा करुन नका सोबत लहान मुलगी आहे असे सांगतले. याचा राग आल्याने संशयिताने शिवीगाळ व ढकलाबुकल करण्यास सुरवात केली. त्यावेळी इमरान फणसोपकर व शोएब मुजावर यांनी सोडवा सोडव केली. त्यानंतर रात्री 11 वा. सुमारास संशयित अफरात, इमरान आणि वासिम यांनी फिर्यादीला यांच्या घराजवळ संशयित अफरातने हातातील लोखडी रॉड मारुन दुखापत केली.
त्याचप्रमाणे फिर्यादी इमरान अब्बास फणसोपकर ( 38, रा. राजिवडा, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित फैजान फणसोपकर फिर्यादी यांच्याकडे भाडोत्री वासीम मुल्ला व त्याची पत्नी नुरजहॉ मुल्ला हे घरी असताना त्यांचा मुलगा अफान याला फैजान फणसोपकर यास त्याचे झालेल्या भांडणावरुन संशयित वासिम मुल्ला व पत्नी नूरजहॉ यांना त्यांच्या घरी जावून मारहाण केली. फिर्यादी हे त्यांना सोडवायला गेले असता संशयित फैजान फणसोपकर लोखंडी रॉडने उजव्या हाताच्या मनगटावर मारुन व सुरी हातावर मारुन दुखापत केली या प्रकरणी फिर्यादी फैजान फणसोपकर व इमरान फणसोपकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांवर परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.












