वनगुळे शाळा नं. १ चे दोन विद्यार्थी राज्याबाहेरील‌ अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील वनगुळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वनगुळे नं. १ चे दोन विद्यार्थी केरळ तिरूअनंतपुरम आणि कन्याकुमारी येथे भेट देण्याकरिता रवाना झाले आहेत.‌
समग्र शिक्षा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या राज्या बाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी म्हणजे केरळ तिरूअनंतपुरम आणि कन्याकुमारी येथे अभ्यास दौऱ्यासाठी वनगुळे शाळा नं. १ चे विद्यार्थी प्रितिश पिनवणकर व श्रेयस माने यांची निवड करण्यात आली होती.
राज्या बाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी हे दोन विद्यार्थी नुकतेच रवाना झाले.‌ तत्पूर्वी शाळेत त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.‌ यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणपत गुरव, सरपंच प्रभाकर गुरव, उपाध्यक्ष सौ सुप्रिया पराडकर, मुख्याध्यापक रविंद्र निवळे ,पदवीधर शिक्षक विलास गोरे, सहाय्यक शिक्षक बाळू नागरगोजे, पदवीधर शिक्षक दीपक सातपुते, शिक्षणतज्ञ सौ शुभ्रा ठाकूर देसाई आदी उपस्थित होते.