खारेपाटण दूरक्षेत्रातील अंमलदार पराग मोहिते यांचे निधन

कणकवली : सिंधुदुर्ग पोलीस दल अंतर्गत खारेपाटण दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पराग प्रभाकर मोहिते (वय ३९, मूळ रा. आंबेड बुद्रुक ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

 

पराग मोहिते हे २६ डिसेंबर २०१२ रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी भरती झाले होते. २९ सप्टेंबर २०२० पासून ते कणकवली पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. सध्या ते कणकवली पोलीस ठाणे अंतर्गत खारेपाटण दूरक्षेत्रात नेमणुकीस होते.

 

अत्यंत मनमिळाऊ व सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे सहकाऱ्यांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई व वडील असा परिवार आहे.