नूतन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्या यांचा चौके ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळा संपन्न
चौके l प्रतिनिधी :- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातून जवळपास 40 वर्षानंतर चौके पंचक्रोशीतून चौके गावची कन्या सौ अक्षता राजन गावडे या शिवसेना भाजप महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या तसेच कुंभारमाठ पंचायत समिती सदस्यपदी सौ मानसी प्रमोद भोगावकर या शिवसेना पक्षातून निवडून आल्या या दोन्ही सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा चौके ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते चौके ग्रामपंचायात कार्यालय येथे करण्यात आला यावेळी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.श्याम चव्हाण उपस्थित होते.
यावेळी श्री दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे साहेब यांच्या माध्यमातून चौके गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच अपूर्ण ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही दिली.
चौके ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सौ अक्षता राजन गावडे आणि पंचायत समिती सदस्या मानसी भोगावकर यांचा भव्य सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पी.के. चौकेकर होते तर व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्याम चव्हाण सत्कारमूर्ती सौ.अक्षता गावडे, सौ. मानसी भोगावकर,माजी सरपंच राजा गावडे, सुरेश चौकेकर सामाजिक कार्यकर्ते बिजेंद्र गावडे ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी , उद्योजक नाना आंबेरकर आदी उपस्थित होते .
सत्कार समारंभाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शन पण भाषणात शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री दत्ता सामंत पुढे म्हणाले की ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद राज्यात आणि केंद्रात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे विकास काम करताना कोणत्याही प्रकारचे अडचण भासणार नाही आपण चौके गावातील सुचवलेल्या विकास कामांचा आराखडा तयार ठेवा तसेच भराडी मंदिर पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी निधीची उपलब्धता निश्चित केली जाईल तसेच ग्रामीण भागात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे क्रिकेटच्या मॅच ना पैसे न देता प्रत्येक गावात तज्ञ डॉक्टर आणून आरोग्य शिबीरे आयोजित करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरजूंना मदत आपण करणार असे सांगितले यावेळी मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनीही आपण प्रशासकीय स्तरावरून सहकार्य करण्याची ग्वाही दिली .
यावेळी माजी सरपंच सुरेश चौकेकर यांनी चौके गावातील भराडी मंदिर परिसर विकसित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि विकास कामांबरोबरच पूर्वी स्ट्रीट लाईट बिल जिल्हा परिषद मार्फत भरले जायचे परंतु ते बंद केले आणि ग्रामपंचायतींवर तो भुर्दंड टाकण्यात आलेला आहे . ग्रामपंचायतीना आर्थिक दृष्ट्या ते परवडणारे नाही त्यामुळे राज्य शासनाकडून हा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी केली तर बिजेंद्र गावडे यांनी चौके गावाला पाणीपुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. नळपाणी योजना खूप जुनी झाली आहे त्यासाठी शासनाकडून खास बाब म्हणून प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली .यावेळी सदाशिव गावडे गुरुजी यांनीही शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
नवनिर्वाचित सदस्या अक्षता गावडे आणि मानसी भोगावकर यांनी चौके गावातील मतदारांचे आभार मानत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे अभिवचन दिले आणि सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली .
या सत्कार कार्यक्रमामध्ये श्री दत्ता सामंत गटविकास अधिकारी श्री चव्हाण,माजी सरपंच राजा गावडे यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी नवनिर्वाचित जि प सदस्या पंचायत समिती सदस्या यांचा सत्कार आदर्श व्यापारी संघटना चौके, वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळ चौके,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका ,चिरेखाण संघटना चौके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत सरपंच पी.के चौकेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले तर ग्रामपंचायत अधिकारी श्री निकम यांनी आभार मानले कार्यक्रमाला तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे,माजी सरपंच मधुकर चौकेकर ,सचिन आंबेरकर तसेच मंगेश पात्रे, मोहन गावडे ,दीनानाथ गावडे रमाकांत देसाई बंड्या गावडे, श्रीमती निरा सावंत, उदय गावडे विनायक गावडे चिरेखान संघटनेचे अध्यक्ष दत्ता गावडे, पोलीस पाटील रोहन चौकेकर,ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी शासकीय निम शासकीय कर्मचारी ,प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आरोग्य सेवक , ग्राम संघ अध्यक्ष ,बचत गटाचे प्रतिनिधीआणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











