सोमवारी 23 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू उपोषण
लांजा (प्रतिनिधी) आपल्या विविध मागण्यासाठी लांजा पंचायत समिती मधील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून आंदोलनाचा आजचा मंगळवारचा हा दुसरा दिवस आहे.
लांजा पंचायत समिती मधील लिपिक संवर्गातील कर्मचारी हे काम बंद आंदोलनात उतरले असून जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना शाखा लांजा या संघटनेच्या माध्यमातून हे काम बंद आंदोलन सुरू आहे. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी पासून या काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना चौथा वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, पदनामात बदल करणे व पदोन्नतीचे स्तर कमी करणे, सर्वांना जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे, एक नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुकंपाच्या प्रतीक्षा सूचीवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे आणि जिल्हा परिषद मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे समावेशन मृद व जलसंधारण विभागांमध्ये न करणे आदी मागण्यासाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे.
लांजा पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर हे सर्व कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेले असून आज मंगळवारचा या दुसरा दिवस असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर झाल्याचे दिसून येत आहे










