राजापूर (वार्ताहर): दक्षिण काशी म्हणून पुरातना काळापासून प्रसिध्द असलेल्या राजापूर शहरानजीकच्या उन्हाळे येथील गंगातिर्थ क्षेत्रातील काशी कुंडात एक शिलालेख आढळला असून हा शिलालेख १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असल्याचे मत पुणे येथील इतिहास संशोधक व शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी स्पष्ट केले आहे.
“चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर” अशी अक्षरे या शिलालेखावर कोरलेली असून या शिलालेखावर काळाचा उल्लेख नसल्याने याचा कालावधी समजून येत नाही मात्र अक्षरांचे वळणदारपण पाहता हा शिलालेख १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दोनदा गंगास्नान केल्याचे उल्लेख काही बखरींमध्ये सापडतात. तसेच १६६४ मध्ये त्यांच्या विनंतीवरून गागाभट्टांनी येथे विद्वानांची सभा भरवल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत.
काशी कुंडात ज्या ठिकाणी गंगापुत्र कळशी ने पाणी घेतात म्हणजेच कळशी बुडवितात त्या ठिकाणी एका दगडावर हा शिलालेख आहे. या शिलालेखाची अक्षरे वळणदार असून अद्यापही स्पष्ट आहेत. राजापूरच्या गंगेचा उल्लेख मेदिनी पुराणातही मिळतो. सातवाहन राजा गांडरादित्याने या गंगास्थानाचा जीर्णोध्दार करताना येथील कुंडे बांधली असल्याचे मानले जाते तर शालिवाहन राजा सोमेश्वर याने ही या गंगास्थावर आपल्या काळात (इ.स. १२५५-१२६५) वस्ती केल्याचे उल्लेख इतिहासात मिळतात.
शिलालेखाचा अर्थ
“(श्रीच्या) चरणरज (मानीत असलेले) भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर”
म्हणजे काशी-निवासी जोशी वंशातील भास्कर, जे सोमेश्वरकर म्हणून ओळखले जातात, (ते) चरणरज समान पवीत्र..










