मसुरे | झुंजार पेडणेकर
गणेश चतुर्थीच्या सणाकरिता आडवली मालडी ग्रामपंचायत कार्यालय व परिसर येथे 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या फुलपत्री, फराळ, कोकणी मेवा, धूप , अगरबत्ती,दरवाजा तोरण, इलेक्ट्रिक साहित्य तोरणे, किराणा साहित्य अशा विविध प्रकारचे स्टॉल ग्रामपंचायतच्या वतीने सर्व बचत गट, गावातील व्यापारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून मिनी एकदिवसीय बाजार आयोजित करण्यात येत आहे. तरी गावातील लोकांना ग्रामस्थांना विनंती आहे की, या संधीचा लाभ घेऊन व्यवसाय करणाऱ्या स्थानिक बचत गट, व्यापारी वर्ग व ग्रामस्थ यांना खरेदी विक्री साठी सहकार्य करावे व जास्तीत जास्त खरेदी करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन ग्रामपंचायत आडवली मालडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












