साळगाव येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक प्रकाश मेस्त्री यांचे निधन

 

कुडाळ : तालुक्यातील साळगाव येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच केंद्रप्रमुख श्री प्रकाश श्रीधर मेस्त्री (वय ७०) यांचे गुरुवार दिनांक २७ रोजी हृदयविकाराने दुखःद निधन झाले.
साळगाव पंचक्रोशी मध्ये “मेस्त्री गुरुजी” नावाने ओळखले जाणारे
श्री प्रकाश मेस्त्री हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते. तसेच वडीलोपार्जित हार्मोनियम मेकर म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तसेच कोल्हापूर येथील विवाहित मुलगी २ मुलगे व २ सूना आणि १ नातू असा परिवार आहे. साळगाव येथील डॉक्टर श्रीधर मेस्त्री यांचे ते वडील होत.