कोकण विकासाचा जलमार्ग…!

वार्तापत्र-कोकण/ संतोष वायंगणकर

मुंबईकर कोकणवासिय तसेच कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना कोकणात येताना आपलं स्वत:च वाहन सोबत बोटीतून घेऊन येता येईल अशी व्यवस्था या एम२ एम प्रिंसेस कंपनीची ही बोट कोकणात १ मार्च पासून सुरू झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कोकणच्या विकासातील हे एक पुढच पाऊल ठरले आहे. कोकणच्या पर्यटन विकासाबरोबरच कोकणातील पर्यटनासंबंधी सर्व व्यवसायांना निश्चितपणे गती प्राप्त होणारी आहे. कोकणात प्रवास करण्यासाठी विमान, रेल्वे आणि रस्ता मार्ग आहे. परंतु जलमार्गाच्या प्रवासाचा आनंद घेतानाच अवघ्या सहा-सात तासात कोकणात पाऊल पडणार आहे. सकाळचा नाश्ता मुंबईत आणि दुपारच जेवण कोकणात इतका छान प्रवास हा कोकणातील किनारपट्टीच्या गावात रहाणाऱ्या व्यवसायिक आदींसाठी असणार आहे. ही अतिशय आनंददायी आणि स्वागतार्ह आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्गचा हा कोकणातील रो-रो बोटसेवेचा पहिला टप्पा आहे. यापुढच्याकाळात रत्नागिरी आणि भविष्यात ही रो-रो बोटसेवा आणखीही पुढच्या बंदरामध्ये सुरू होऊ शकेल…

 

पन्नास वर्षापूर्वी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांसाठी कोकणातील जलमार्ग हा सर्वात जवळचा आपला वाटणारा बोटीचा प्रवास होता. परंतु दळणवळणाच्या प्रगत साधनामध्ये कोकणचा हा जलमार्ग मागे पडला. त्यात तत्कालिन मुख्यमंत्री कै.बॅ. ए.आर.अंतुले यांच्या संकल्पनेतील सागरी महामार्ग आजही अनेक ठिकाणी अडथळे सहन करीत आहे. हा सागरी महामार्ग मुंबई ते कोकणची किनारपट्टी जोडणारा महत्वाचा असा सागरी महामार्ग होता. खरंतर मुंबईच्या भाऊच्या धक्यावरून वाहतुक होणारी बोट वाहतुक मधल्या अनेक कारणानी बंद पडली होती. ही बोट वाहतुक एका अपघातानंतर पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे एकेकाळी गजबजलेली आणि अर्थकारणाला फारमोठा हातभार लावणारी ही कोकणबोट बंद झाल्यानंतर कोकणातील किनारपट्यावरील बाजारपेठांचाही व्यवहार पूर्णपणे मंदावला. रेवस ते रेडी या जलमार्गाला उतरती कळा आली. गजबजलेल्या किनाऱ्यावरच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून काहीसा या बाजारपेठांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी पूर्वीचे ऐश्वर्य प्राप्त होणं तसं अवघडच होतं. पस्तीस वर्षापूर्वी कोकणातील तत्कालिन मंत्री स्व.भाईसाहेब सावंत यांनी गोवा येथील चौगुले शिपयार्ड कंपनी मार्फत कॅटमरीन नावाची बोट वाहतुक सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री यांनी गेल्यावर्षभरात कोकणात जलवाहतुक सुरू व्हावी यासाठी प्रयत्न चालविले आहेत. केवळ प्रवासी वाहतुक न होता. कोकणात येणाऱ्या मुंबईकर कोकणवासिय तसेच कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना कोकणात येताना आपलं स्वत:च वाहन सोबत बोटीतून घेऊन येता येईल अशी व्यवस्था या एम२ एम प्रिंसेस कंपनीची ही बोट कोकणात १ मार्च पासून सुरू झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कोकणच्या विकासातील हे एक पुढच पाऊल ठरले आहे. कोकणच्या पर्यटन विकासाबरोबरच कोकणातील पर्यटनासंबंधी सर्व व्यवसायांना निश्चितपणे गती प्राप्त होणारी आहे. कोकणात प्रवास करण्यासाठी विमान, रेल्वे आणि रस्ता मार्ग आहे. परंतु जलमार्गाच्या प्रवासाचा आनंद घेतानाच अवघ्या सहा-सात तासात कोकणात पाऊल पडणार आहे. सकाळचा नाश्ता मुंबईत आणि दुपारच जेवण कोकणात इतका छान प्रवास हा कोकणातील किनारपट्टीच्या गावात रहाणाऱ्या व्यवसायिक आदींसाठी असणार आहे.हे अस नव काही प्रकल्प केवळ राणेच आणू शकतात. काही करु शकतात हे देखील या निमित्ताने ना. नितेश राणे यांनी अधोरेखित केले आहे.
कोकणच्या विकासासाठीचे प्रयत्न आणि नवीन काही घडणार असेल, होणार असेल तर कोकणातील सर्वच जनतेने त्याच स्वागतच करायला हवं. जेव्हा केव्हा नव्याने काही सुरू होईल तेव्हा निश्चितपणे त्यात अनेक त्रुटी, दोष हे असणारच आहेत. ते दोष निश्चितपणे दूर करता येऊ शकतात. या रो-रो बोट सेवेसंबंधीही काहीही असले तरीही पहिल्या प्रथम ही बोटसेवा कोकणात सुरू होतेय. ही अतिशय आनंददायी आणि स्वागतार्ह आहे. भाऊचा धक्का ते विजयदुर्गचा हा कोकणातील रो-रो बोटसेवेचा पहिला टप्पा आहे. यापुढच्याकाळात रत्नागिरी आणि भविष्यात ही रो-रो बोटसेवा आणखीही पुढच्या बंदरामध्ये सुरू होऊ शकेल.
या रो-रो बोटसेवेच्या निमित्ताने एक वास्तव आठवल म्हणून सांगतो, कोकणातील सिंधुदुर्गात चिपी येथे आज असलेला विमानतळ हा विद्यमान रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी चिपीला आंतरराष्ट्रीय विमानतळ उभ राहील यासाठी प्रयत्न केले होते. तसा आराखडा आणि प्रस्तावही तयार करण्यात आला होता. तेव्हा गोव्यातील मोपाला आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याचा विषय देखिल चर्चेत नव्हता. परंतु चिपी विमानतळाच्या शुभारंभांपासूनच काळेझेंडे दाखवुन जो विकासाला अपशकुन करण्यात आला त्यातून पुढे काय घडल आणि कोणी काय साध्य केलं हे आज कोकणासमोर आहे. या चिपी विमानतळानजिक पायलट प्रशिक्षण केंद्रही प्रस्तावित होते. परंतु केवळ या सर्वाला विरोध करताना कधी ‘पेन्सिल नोंदी’ आणखी काही चर्चा करून प्रकल्पाची ही आजची स्थिती आहे. कोकणच्या विकासामध्ये नव्याने कोणी काही प्रयत्न करत असेल मग कोण कुठल्याही पक्षाचा असला तरीही केवळ कोकण म्हणून विरोधापेक्षा सूचना करत त्या प्रकल्पाचे भविष्यात स्वागतच व्हायला हवे अशी अपेक्षा आहे. राजकीय नेते, पुढाऱ्यांना राजकारण करण्यासाठी राजकीय इश्यू म्हणून अनेक गोष्टी आहेत. परंतु कोणत्याही चांगल्या कामात केवळ शुभेच्छांसाठी तरी आपण सर्वजण सहभागी होऊ शकतो. रो-रो बोटसेवेच्या माध्यमातून आजच्या घडीला फार पूर्वीपासून सुरक्षित म्हणून ओळखले जाणाऱ्या विजयदुर्ग बंदरामध्ये ही रो-रो बोटसेवा सुरू झाली आहे.
विजयदुर्ग बंदराला शिवकालीन आरमाराचे मुख्य केंद्र म्हणून विजयदुर्ग किल्याची एक वेगळी ओळख आहे. विजयदुर्ग बंदरातून कोकणातील कृषिमाल देखिल या माध्यमातून भविष्यात मुंबई शहरात नेता येणार आहे. कोकणात पूर्वी जेव्हा बोट वाहतुक सुरू होती तेव्हा कोकणातील रेवस ते रेडीपर्यंत सर्व बंदरांमध्ये भरभराट होती. व्यावसायिकांना चांगले दिवस होते. कोकणातील किनारपट्टीच्या बंदर परिसरातील गावांना निश्चितपणे चांगले दिवस येतीलच. मुंबई ते विजयदुर्ग-देवगड प्रवासाला रस्ते मार्गाने किंवा रेल्वेमार्गानेही जरी प्रवास केला तरीही १४-१५ तासापेक्षा अधिकचा वेळ लागतो हाच प्रवास विशेषकरून देवगड, विजयदुर्ग, राजापूर तालुक्यातील जनतेसाठी अधिक सोईचा, वेळेची बचत करणारा ठरणार आहे. एकदा एम- टू-एम रो-रो बोटसेवा व्यवस्थितरित्या सुरू झाली की निश्चितपणे भविष्यात आणखी कोणत्या सुधारणा करणे आवश्यक आहे. त्रुटी कोणत्या रहात आहेत. यावर चर्चा करता येऊ शकते. त्यातूनच निश्चितपणे कोकणच्या विकासाला गती देणारा, कोकणच्या अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर’ देणारी ही रो-रो बोटसेवा असेल. त्यादृष्टीकोनातून आपण सर्वांनीच या रो-रो बोटसेवेकडे पहाण्याची आवश्यकता आहे.
कोकणच्या किनारपट्टीवरचे डोळयात साठवून ठेवू शकू असे सृष्टी सौंदर्य कोकणात आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढण्यास ही रो-रो बोटसेवेच्या माध्यमातून मदत होणारी आहे. रविवार १ मार्च रोजी या रो-रो प्लस बोटसेवेचा शुभारंभ झाला आहे. कोकणच्या अर्थव्यवस्था अधिक वाढविण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी कोकणातील हा जलमार्ग महत्वाचा ठरेल यात शंका घेण्याचे कारण नाही. कोकणवासियांनी यासाठी सकारात्मकतेने पहाण्याची आवश्यकता आहे.