आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यमहोत्सव

संजू परब मित्रमंडळाच्या माध्यमातून १५ ते १७ मार्च रोजी आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी: आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे निलेश राणे यांच्या उपस्थितीत या नाट्य महोत्सवाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, युवा तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, संदेश सोनुर्लेकर, राकेश पवार आदी उपस्थित होते.

    ते म्हणाले, १५ ते १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता या नाट्यमहोत्सवातील ट्रीकसीनयुक्त दशावतार नाटके सादर होणार आहेत. यामध्ये भर्तरी पिंगळा, व्यंकट रमणा जय गोविंदा, जिव्हेश्वर आदी ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगांचा समावेश आहे.

   तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून फळ वाटप, धान्य वाटप, गरजूंना मदत तसेच माजी नगरसेवक गुरू मठकर यांच्या माध्यमातून सायकल वाटप आदी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तिनं दिवस सावंतवाडीत होणाऱ्या नाट्य महोत्सवाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असं आवाहन श्री. परब यांनी केल आहे‌.