हलगर्जी करणाऱ्यांना सोडणार नाही, दोषींवर कारवाई होणार

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा इशारा

ना. नितेश राणे यांच्याकडून कोसळलेल्या भिंतीची पाहणी 

सावंतवाडी l प्रतिनिधी :सावंतवाडी जिल्हा कारागृहाची भिंत कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. बांधकामाची तीन – तीन महिन्यात बिले निघतील अशी कामं करू नका असे स्पष्ट निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत. माझ्या कारकिर्दीत अशी उधळपट्टी करायला मी देणार नाही. सा. बां. चे मुख्य अभियंता एस. एन. राजभोज यांच्याशी बोलणं झालं असून ते स्वतः पाहणी करणार आहेत. ऐतिहासिक वास्तूंसोबत अशा घटना घडता नये हीच भूमिका सरकारची आहे. बांधकाम अधिकाऱ्यांनी काम करताना काळजी घेतली पाहिजे होती. हलगर्जीपणा करणाऱ्यांना मी सोडणार नाही. दोषींवर निश्चितपणे कारवाई होणार, असा इशारा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिला.

 

सावंतवाडी येथील संस्थानकालीन जिल्हा कारागृहाची सुमारे १४३ वर्षांपूर्वीची काळा दगड आणि मातीपासून बांधलेली संरक्षक भिंत कोसळली होती. या घटनेची पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी शनिवारी याठिकाणी दाखल होत पाहणी केली. अंदाजे ४० मीटर लांबीची ही भिंत कोसळल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.

 

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, गुरुनाथ पेडणेकर, महेश सारंग, पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, जिल्हा कारागृह अधीक्षक संजय मयेकर, सावंतवाडी कारागृह अधीक्षक सतिश कांबळे, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता वैभव सगरे, अभियंता विजय चव्हाण आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

ना. नितेश राणे म्हणाले, जिल्हा कारागृहाची १४३ वर्ष जुनी ही वास्तू आहे. भितींच्या वरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागानं केले होते. संपूर्ण इमारतीचा ऑडिट रिपोर्ट नव्यानं करण्यात येणार आहे. त्यामुळे नेमकी कुठे डागडुजीची आवश्यकता आहे हे देखील लक्षात येईल. या खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ. जिल्हा नियोजन मधून ज्या गोष्टी करता येईल त्या कायमस्वरूपी करु अशी माहिती दिली.

 

स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशीही मी चर्चा करणार आहे. अशा वास्तू जपण्यासाठी आमचा कायम प्रयत्न राहील. पुढची १०० वर्ष टीकेल असंच काम केलं जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागानं काम करताना काळजी घेतली पाहिजे होती. अन्यथा अशी दुर्घटना घडली नसती. हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणारा मी नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, अशी माहिती मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.

 

ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेणारे आमचे सरकार आहे. तीन तीन महिन्यात बील निघतील अशी कामं करू नका, असे स्पष्ट निर्देश आम्ही अधिकाऱ्यांना दिलेत. कायमस्वरूपी टीकेल असं काम करणं अपेक्षित आहे. माझ्या कारकिर्दीत अशी उधळपट्टी करायला देणार नाही. गरज होती म्हणून भिंत वाढवली होती. पण योग्य ती काळजी घेतली नाही. यात चुका झाल्या असून जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.

 

यावेळी माजी सभापती अंकुश जाधव, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, रविंद्र मडगावकर, मोहीनी मडगावकर, ॲड. परिमल नाईक, महेश धुरी, अजय गोंदाळे, उदय नाईक, मधुकर देसाई, दिलीप भालेकर, गुरुनाथ मठकर, बाबा काणेकर, मेघना साळगावकर, उमेश पेडणेकर, संजय शिरसाट, चंद्रकांत जाधव, कुणाल शृंगारे आदी उपस्थित होते.