विद्यार्थ्यांकडून ५००कलमे बांधण्याचा निर्धार
माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे आंबा कलम बांधण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना आंबा ,काजू कलम बांधता याव यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यावर्षी आंब्याच्या विविध जातीची ५०० कलमे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये संस्थेचे संचालक कुलदीप भागवत यांनी कलम बांधणी प्रात्यक्षिक दाखवले व विद्यार्थ्यांना कलम बांधणी विषयी सगळी माहिती दिली.व विद्यार्थ्यांकडून कलमे बांधून घेतली.यावेळी रत्नागिरी हापूस,नीलम,केशर,तोतापुरी आदी विविध जातीच्या काड्या घेऊन कलम बांधणी करण्यात आली.बाटा कलम प्रात्यक्षिकावेळी शाळेच्या मुलांसह, गुरुकुल पूरक उपक्रमामध्ये सहभागी असलेली मुले उपस्थित होती.यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद साठे यांनी स्वतः कलम बांधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.माखजन हायस्कुल मधून बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्याला आंबा,काजू कलम बांधता यायला हवे ,अशी भूमिका डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम राबवत असल्याचे अध्यक्ष आनंद साठे यांनी सांगितले.या वेळी संस्था सचिव राजेश फणसे,दत्ताराम गुरव,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,हरित सेना प्रमुख विठ्ठल भोईर,गुरुकुल विभाग प्रमुख सचिन साठे,महादेव परब,चंद्रकांत चाचे,ओंकार नामजोशी,आदी उपस्थित होते.यावेळी आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.












