आमदार निलेश राणे यांचे लांजा येथे शिवसेना कार्यकर्त्यांकडून भव्य दिव्य स्वागत
लांजा (प्रतिनिधी) :रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे. पुढील २५ वर्षापर्यंत तो एक नंबरच राहिला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी लांजा येथे केले.
सिंधुदुर्गहून रत्नागिरीच्या दिशेने जात. असताना आमदार निलेश राणे यांचे बुधवारी सायंकाळी लांजा येथे आमदार किरण सामंत यांच्या निवासस्थानी भव्यदिव्य स्वरूपात जल्लोषी स्वागत करण्यात आले. लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ सावली सुनील कुरूप यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष असून तो पुढील २५ वर्षे तो एक नंबरच राहिला पाहिजे. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्ह्यात एक नंबरच राहिल, यात यात शंका नाही.
ते पुढे म्हणाले की, आज आमदार किरण सामंत यांच्या पदाधिकारी ,कार्यकर्त्यांकडून माझा जो यथोचित असा सत्कार झाला त्यावरूनच आमदार किरण सामंत यांचे कार्यकर्त्यांवर आणि कार्यकर्त्यांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून आले आहे. आमदार किरण सामंत हे आपल्या मतदारसंघात उत्तम प्रकारे कामगिरी करत असल्याचे यावेळी आमदार निलेश राणे यांनी नमूद केले. तसेच सत्ताधारी पक्षाचे असल्याने आपणावर लोकांनी जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात लोकांनी सोपवली जबाबदारी आणि त्यांचा विश्वास आपण सार्थकी लावूया असे आमदार निलेश राणे म्हणाले.
त्यानंतर उपस्थित शिवसेना- भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आमदार निलेश राणे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच केक कापून आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेनेचे लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई ,विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद उर्फ बाबा लांजेकर, पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश उर्फ मुन्ना खामकर, व्यापारी संघटनेचे
प्रसन्न शेट्ये, भाजपा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली यांच्यासह शिवसेना भाजपा पदाधिकारी त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आदी उपस्थित होते.













