सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर केले सन्मानित

सावंतवाडी । प्रतिनिधी : महसूल दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पुढील सात दिवस “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महसूल विभागामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करून महसूल विभागाचा नावलौकिक वाढवण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या अशा अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा महसूल दिनानिमित्त गुणगौरव करण्यात येतो.
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथे महसूल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना सन्मानित करण्यात आले. शासन आपल्या दारी उपक्रम,फर्स्ट कम फर्स्ट आऊट प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी,तसेच आपत्तीमध्ये तात्काळ मदत असे कार्यपद्धती राबवल्याबद्दल सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील केलेल्या कामाची दखल जिल्हा प्रशासनाने जिल्हा प्रशासनने घेतली आहे.