शृंगारतळी येथे पहिल्यांदा रोजा ठेवणाऱ्या चिमुरड्यांचा सन्मान

गुहागर प्रतिनिधी:
अंजुमन दर्दमंदाने तालीमओ तरक्की’ या संस्थेच्या वतीने नुकताच एक अत्यंत कौतुकास्पद आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. यावर्षी पवित्र रमजान महिन्यात पहिल्यांदाच पूर्ण महिन्याचे उपवास रोजा पकडणाऱ्या लहान मुलांचा संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
​या चिमुरड्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. लहान वयात मुलांनी दाखवलेल्या या संयम आणि श्रद्धेचे सर्व उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.
​या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि धर्मगुरु उपस्थित होते. यामध्ये शृंगारतळी अंजुमनचे प्रमुख मौलाना युनूस मुल्लाजी, मौलाना इर्शाद मुल्लाजी, मौलाना मुश्ताक, मौलाना तौफिक, मौलाना नासीम साल्हे, मौलाना जैनुल आबीदिन, हाफिज मुस्तकिम आणि हाफिज अब्दुल वहाब, तसेच आसिम साल्हे, सफवान साल्हे, कलीम वनू, अशफाक मुल्लाजी, मुनाफ साल्हे, नूरमोहम्मद साल्हे, शोएब घारे यांसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे आणि चिमुरड्यांच्या यशाचे संपूर्ण शृंगारतळी परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.