डॉ. सायली व डॉ. प्रफुल्ल यांचा विवाह सोहळा थाटामाटात संपन्न

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असलेल्या गटशिक्षण अधिकारी श्री विजय बाईत यांच्या कन्या डॉ. सायली यांचा विवाह डॉ. प्रफुल्ल यांच्यासोबत अत्यंत थाटामाटात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
या मंगल प्रसंगी श्री व सौ. संजय क्षीरसागर तसेच श्री व सौ. विशाखा विजय बाईत यांच्यासह कुटुंबीयांनी उपस्थित राहून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. लग्न समारंभ पारंपरिक पद्धतीने व आनंददायी वातावरणात पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांच्या पत्नी तसेच खेड पंचायत समितीच्या सदस्या समिधा म्हादे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
संपूर्ण विवाह सोहळा आनंद, उत्साह आणि मंगलमय वातावरणात पार पडला असून नवदांपत्याच्या पुढील आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.