रुग्णवाहिकेचे लोकार्पण उपस्थिती; कार्याचे केले कौतुक

कणकवली : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, गोट्या सावंत हे सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, ही जनतेसाठी अत्यंत उपयुक्त अशी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला भाजपा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,माजी अध्यक्ष सौ. संजना संदेश सावंत, सभापती हर्षदा वाळके, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री,विजय भोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.












