आंबोली येथे २३ व २४ मे रोजी पतसंस्थांचे दोन दिवसीय अधिवेशन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदूर्ग जिल्हा हा निसर्ग संपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत छोट्या मोठ्या दिडशेच्या च्या जवळपास पतसंस्था कार्यान्वित आहेत. अगदी ग्रामीण भागापासुन ते शहरीभागापर्यत छोट्या मोठ्या प्रमाणात आर्थिक देवघेवीचे काम करत आहेत. वैयक्तिक पातळीवर या संस्था काम करत असताना संस्थांसमोर अनेक प्रश्न ही आहेत. या सर्व प्रश्नांना एकत्रित वाचा फोडण्यासाठी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात काम करत असताना एकसंघ होऊन प्रत्येक आव्हानाला तोंड देता यावे म्हणुन सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांना एकाच छताखाली आणणे, पतसंस्थांची संघटनात्मक ताकद वाढवणे असे अनेक व्यापक उद्देश घेऊन सिंधुदूर्ग जिल्हयातील सर्व नागरी, ग्रामीण, विगरशेती, पगारदार, सहकारी पतसंस्था अशा सर्वाचे एकत्रित दोन दिवशीय अधिवेशन आंबोली येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
सदर अधिवेशन निवासी अधिवेशन असुन या मध्ये संस्थेचे चेअरमन, संचालक, वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी, यांचा मोठया संख्येने सहभाग असणार आहे. या दोन दिवशीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यभरातुन अनेक मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशन २३ व २४ मे रोजी आंबोली सैनिक स्कुल परिसरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनासाठी सहकारातील राज्यभरातुन खास दिग्गज मंडळी, अधिकारी वर्ग सुध्दा उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हयाचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदूर्ग यांचे पुर्ण सहकार्य व मार्गदर्शन या अधिवेशनास लाभणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदूर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी केले आहे.












