पनवेल–मडगाव विशेष गाडी २१ व २८ सप्टेंबरला धावणार; कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे
देवगड : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन–पनवेल–मडगाव जंक्शन मार्गावर अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०१११२ मडगाव जंक्शन–पनवेल विशेष २० आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता मडगाव जंक्शन येथून रवाना होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.
तर गाडी क्रमांक ०१११३ पनवेल–मडगाव जंक्शन विशेष २१ आणि २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पनवेल येथून सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांना करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या विशेष रेल्वेला एकूण २१ एलएचबी डबे असतील. यामध्ये १ फर्स्ट क्लास, २ टू टियर एसी, ४ थ्री टियर एसी, २ थ्री टियर एसी इकॉनॉमी, ६ स्लीपर, ४ जनरल, १ एसएलआर/डी आणि १ जनरेटर कारचा समावेश आहे.
या विशेष गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.












