खा. नारायणराव राणे यांची भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कणकवली येथे घेतली सदिच्छा भेट

चिपळूण (प्रतिनिधी)– माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे साहेब यांची भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे भेट घेतली. यावेळी यादव यांनी खा. राणे यांच्याशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधतांना रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा केली. केली. यावेळी खा. राणे यांनी आपुलकीने केलेल्या विचारपूसने प्रशांत यादव भारावून गेले.

भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत कणकवली येथे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी खासदार नारायणराव राणे यांच्याशी संवाद साधताना चिपळूण रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा अशी मागणी करताना गेल्या काही वर्षांपासून चिपळूण शहरावर लाल- निळी रेषा लादण्यात आली असून या पूररेषेमुळे चिपळूण शहराचा विकास खोळंबला आहे. या अनुषंगाने केंद्रीय एजन्सीकडून सर्वेक्षण होऊन उपाययोजना राबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच चिपळूण शहरातील वाढीव उड्डाण पुलासंदर्भातील केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याबाबत यादव यांनी खा. राणे यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नंदू चव्हाण, अभि जगुष्टे, अमोल तटकरे, सर्वेश सुर्वे आदी उपस्थित होते.