चिंदर येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी

 

भाजपा नेते निलेश राणे यांची पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

तपासणी प्रस्ताव सादर करण्याचे पशुसंवर्धन सचिवांचे प्रशासकीय आदेश

मालवण | प्रतिनिधी : चिंदर येथील गुरांचा चाऱ्यातून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. चिंदर येथील एकूण ४८ शेतकऱ्यांची ५३ पेक्षा जास्त गुरे या विषबाधेमुळे दगावली होती. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी पशुसंवर्धन तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार करत चिंदर येथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून चिंदर येथील शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा होईल. याबाबत माहिती भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.