स्वामी समर्थ मठ मसदे येथे 15 रोजी स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त १५ एप्रिल रोजी
श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा ‌न्यास, रजि.
संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट
या मठामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीवर आणि
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज चरण पादुकांवर दुग्ध आणि जलाभिषेक, सकाळी ८ वा. श्री स्वामी समर्थ महाराज यांची षोडशोपचार पूजा अर्चा, सकाळी ८:३० वा. होम हवन, आरती, सकाळी १०:३० वा. पालखी सोहळा, दुपारी १२:३० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण, दुपारी १ वा. – अन्नदान-महाप्रसाद,
सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती, सायंकाळी ७:३० वा. श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ – पोईप, मालवण यांचे सुस्वर भजन( बुवा ओंकार येरम). उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.