१४ लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी
कणकवली : कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर प्रकल्पांतर्गत बंगला बांधून देतो असे आमिष दाखवत शामल मंगेश तळदेवकर (रा.जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघाजणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तेजस सागर घाडीगावकर (३६, रा. भायखळा-मुंबई) आणि इल्टन पिटर नर्होना (३५, रा. वरळी-मुंबई) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत. कणकवलीचे पोलिस उपनिरिक्षक अनिल हाडळ यांच्यासह पथकाने कोपरखैराणे,नवी मुंबई येथून त्या दोघांना ताब्यात घेत अटक केली होती.











