रामगड सरपंच शुभम मटकर यांची वारेली चिपळूण येथील झरे पुनर्जीवन प्रकल्पास भेट

लवकरच रामगड गावामध्ये प्रकल्प राबविणार

मसुरे | झुंजार पेडणेकर :रोटरी क्लब ऑफ बॉम्बे व दिगंत स्वराज फाऊंडेशन मार्फत वारेली चिपळूण येथील झऱ्यांचे पुनर्जीवन करून गुरुत्वाकर्षणामार्फत ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला या प्रकल्पाला भेट देत रामगड सरपंच शुभम मटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

कोकणातील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून व पावसाळी व उन्हाळी ऋतूमधील झऱ्याच्या प्रवाहाचा अभ्यास करून झऱ्याच्या प्रवाहाचा मार्ग जास्त खंडित न करता त्या द्वारे डोंगर उतारावर ५ साठवण टाकी मध्ये पाणी जमा करून तब्बल ४ किमी पाइपलाइन चा वापर करून ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासोबतच शेती साठी पाणी पुरवठा करणारा हा प्रकल्प आहे

सदर योजनेबद्दल सरपंच मटकर यांनी कौतुक करत सदर प्रकल्पाचे सादरीकरण सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना सादर करणार आहोत तसेच भाजप जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून व दिगंत स्वराज चे राहुल जी तिवरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून लवकरच हा प्रकल्प रामगड गावामध्ये राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले . रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सोबत या प्रकल्पासाठी पाठपुरावा करून वारेली गावाप्रमाणेच रामगड गावातील ग्रामस्थांना फायदा व्हावा ही इच्छा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली

 

या कार्यक्रम प्रसंगी चिपळूण पंचायत समिती सभापती श्री सूर्यकांत खेतले,रोटरी क्लब चिपळूण व रत्नागिरी चे सभासद ,दिगंत स्वराज चे संचालक श्री राहुल तिवरेकर, किशोर तेली , रामगड सरपंच शुभम मटकर आदी मान्यवर उपस्थित होते