रत्नागिरी : महसूल सप्ताहाच्या निमित्ताने उद्या शनिवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वैश्य भवन, डाक बंगला, ता. खेड येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी केले आहे.










