सिंधुदुर्ग जिल्हा शासनाच्या विविध योजनांमुळे विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून शेतकऱ्यांना ठोस आधार मिळत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून कष्टाला यंत्रांची साथ लाभत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणे आणि दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे हा आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र तसेच इतर आधुनिक साधनांच्या खरेदीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जात आहे.
जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे ८ हजार लाभार्थ्यांना तब्बल १७ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होत असून शेतकरी अधिक सक्षम होत आहेत.
अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला www.krushi.maharashtra.gov.in भेट द्यावी.
शासनाच्या योजनांमुळे शेतकऱ्यांना नवे बळ आणि नवा आत्मविश्वास मिळत असून सिंधुदुर्ग जिल्हा अधिक आत्मनिर्भर, सक्षम आणि समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
प्रस्तुती – जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग












