ऑनलाईन गेम्स’च्या आहारी जाऊन २४ वर्षीय तरुणाची आत्म्हत्या…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे 

 

हातकणंगले: तालुक्यातील कोरोची गावातील एसटी स्टँड परिसरात ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य मिलिंद कोळी (वय २४) रा.एसटी स्टँड मागे कोरोची असे मयत तरुणाचे नाव आहे.सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आदित्यने आपल्या घरातील लोखंडी खांबाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.ही घटना उघड आल्यानंतर कोरोची गावात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून त्यात ऑनलाइन गेम्सच्या नादात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या व्यसनामुळे आदित्य कर्जबाजारी झाला होता तसेच कर्जाच्या ओझ्यामुळे तो मानसिक तणाव आणि निराशात होता. परिस्थिती हाताळताना आल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे त्याने स्वतः सुमारे ३५ हजार रुपयांचा मोबाईलही विकला होता. मात्र, आर्थिक अडचणी आणि वाढते कर्ज यामुळे तो अधिकच खचला होता.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.