सन २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षात वाणिज्य शाखेची इंग्रजी माध्यमाची स्वतंत्र तुकडी सुरू होणार 

 इंग्रजीचे महत्त्व लक्षात घेऊन लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचा निर्णय 

लांजा (प्रतिनिधी) आज सर्वच क्षेत्रात इंग्रजी भाषेचा वाढता वापर आणि असलेले महत्त्व लक्षात घे लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सन २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षात ११ वी वाणिज्य शाखेची इंग्रजी माध्यमाची एक स्वतंत्र तुकडी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

सध्याच्या युगात इंग्रजी भाषा ज्ञान, इंग्रजी भाषेवरील आपले प्रभुत्व आणि इंग्रजी भाषेतून घेतलेल्या शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.आज कोणत्याही कंपनीत आपण जेव्हा इंटरव्ह्यू साठी जातो, तेव्हा वरील सर्व बाबींचा प्राधान्याने विचार केला जातो.तेथे आपण कमी पडलो तर आपल्या गुणपत्रिकेवरील गुणांची किंमत शुन्य होते. आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांची अशी मानखंडना होऊ नये.कोणत्याही क्षेत्रात आपला विद्यार्थी – विद्यार्थिनी सक्षमपणे उभा राहिला पाहिजे या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून वाणिज्य शाखेची इंग्रजी माध्यमाची स्वतंत्र तुकडी सुरू करण्याचा निर्णय लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीने घेतला आहे

इंग्रजी माध्यमाच्या तुकडीमध्ये प्रवेश मर्यादित आहेत.जे विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेऊ इच्छितात, त्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी यांची नोंद घ्यावी.तसेच इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी लवकरात लवकर करावी. या संधीचा अधिकाधिक विद्यार्थी लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक,न्यू इंग्लिश स्कूल व तु पुं शेट्ये कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,लांजा यांनी केले आहे.