देवगड / प्रतिनिधी
संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा. भारतातून गोहत्या पूर्णपणे नष्ट करावी, आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन गो सन्मान अभियानांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना देण्यात आले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ खडपे, गगनगिरी आश्रम- पाटथरचे राजाराम परब, गो सन्मान अभियानाच्या निवेदन सौ. वैदेही ओगले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – देवगडचे कार्यवाह महेश कानेटकर, राष्ट्रसेविका समितीच्या कार्यवाहिका सौ. मंगला बिडये, भाजपचे देवगड शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर, तालुका सरचिटणीस महेश जंगले, न. पं. गटनेते शरद ठुकरुल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – मिठबावचे उपखंडप्रमुख सुनील बापट, राष्ट्रसेवा भारतीचे भगिरथ राणे, प्रशांत बिडये, प्रशांत घाडी, दत्ताराम घाडी, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, निखिल कोयघाडी आदी उपस्थित होते. गायीसाठी योग्य अनुदान मिळावे, गो मातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावे, गो सेवेला ठोस केंद्रीय कायदा लागू करावा आदी प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.










