आजीच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या नातवासह साथीदारांच्या पोलीस कोठडीत अजून दोन दिवसांची वाढ 

कणकवली : ओटव-ओटववाडी येथील वृद्ध आजीच्या घरात जबरी चोरी करणाऱ्या नातवासह त्याच्या साथीदारांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी संपली. त्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.