महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ या भव्य स्पर्धेमध्ये लांजातील खेळाडू चमकले

विघ्नेश दिवाळे याने सुवर्णपदक तर आराध्य सावंतची कांस्य पदकाची कमाई”

लांजा ( प्रतिनिधी): विरार येथे झालेल्या व्हिक्टरी क्लब ६ वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ या भव्य स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या दोन खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सदरची स्पर्धा दि.२८ व २९ एप्रिल रोजी विरार येथे पार पडली. या भव्य स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील गुरुकुल तायक्वॉंदो स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीच्या विघ्नेश विनोद दिवाळे याने सुवर्णपदक जिंकत अव्वल कामगिरी केली, तर आराध्य कमलाकर सावंत याने कांस्यपदक मिळवून यश संपादन केले. या दोन खेळाडूंनी प्रशिक्षिका शितल विरेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत पदके पटकावली.
या यशस्वी कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कर्रा, सचिव लक्ष्मण कर्रा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, लांजा अकॅडमीचे अध्यक्ष किशोर यादव, मार्गदर्शक परशुराम मासये, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, गौरव दीपक खेडकर, गणेश ईश्वर तोंडारे, तेजस वडवलकर, योगेश ईश्वर तोंडारे यांच्यासह सर्व खेळाडू व पालक वर्गाने विजेत्यांचे अभिनंदन केले.