लांजा (प्रतिनिधी): लांजा कोत्रेवाडी येथे बच्चे कंपनीने भरवलेल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज बुधवारी सकाळी वाडीतील ज्येष्ठ नागरिक शिवाजी तथा आबा शिर्के यांच्या हस्ते झाले.
कोत्रेवाडी युवा मित्र मंडळ यामध्ये जय सुर्वे, स्वरूप कोत्रे, पूर्वार्ध पराडकर, जय पराडकर, सार्थक खामकर, ऋषभ पवार, युवराज आडविलकर या बच्चे कंपनीने यावर्षी प्रथमच अंडर फार्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. बुधवार आणि गुरुवार दिनांक ३० एप्रिल अशा दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज बुधवारी सकाळी झाले. याप्रसंगी आबा शिर्के यांच्यासह संतोष कोत्रे, मंगेश आंबेकर, संदीप खामकर, अशोक आंबेकर, संतोष शिर्के ,प्रमिल शिंदे, अनिकेत आंबेकर, बंटी साळवी आदी उपस्थित होते
या स्पर्धेसाठी सर्व बच्चे कंपनींना मयुरेश आंबेकर, विनीत आंबेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच वाडीतील ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले आहे. दोन दिवस स्पर्धा चालणार आहे.












