रत्नागिरी: पोलिस दलात विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांना पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात येते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ९ पोलिसांना महासंचालक पदक घोषित झाले आहे.
यामध्ये रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सहायक पोलिस फौजदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, नागरिक हक्क संरक्षण पथकातील मोरेश्वर मयेकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे आणि महिला पोलिस शिपाई शीतल पिंजरे यांना हे पदक जाहीर झाले आहे.










