देवरूख (प्रतिनिधी):
देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी १ मे या महाराष्ट्र दिनानिमित्त नदीतील लहानशा दगडावर रांगोळीच्या सहाय्याने महाराष्ट्राचा नकाशा साकारला असून, त्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराज व हुतात्मा स्मारकाची प्रतिमा रेखाटण्यात अप्रतिम प्रयत्न केला आहे. ही तीन ते चार इंचाच्या या लंबगोलाकार दगडावर संपूर्ण रांगोळी साकारण्यासाठी श्री. विलास रहाटे यांना सुमारे एक तासाचा कालावधी लागला आहे.











