रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील कोकणनगर परिसरातील साईभूमीनगर अपार्टमेंटच्या मागील बाजूस 66 हजारांच्या 5.5 ग्रॅम ब्राउन हेरॉईनसह एका ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवार 1 मे रोजी सायंकाळी 5.17 वा.सुमारस करण्यात आली.
आरमान लियाकत धामस्कर (27,रा.साईभूमीनगर जे.के.फाईल्स,रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल शरद जाधव यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित हा कोकणनगर परिसरातील साईभूमी अपार्टमेंटच्या मागील बाजूस आपल्या ताब्यात 5.5 ग्रॅम वजना ब्राउन हेरॉईन हा अमली सदृश्य पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8 (क),21(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












