विकासकामांत आंगणेवाडीला विशेष प्राधान्य! आमदार निलेश राणे

▪️राणे कुटुंब आणि आंगणेवाडीचे नाते अतूट

▪️ आंगणेवाडी येथे दोन लाख लिटर क्षमतेच्या आरसीसी टाकीचे भूमिपूजन

मसुरे | झुंजार पेडणेकर : आई भराडी मातेची कृपा अनेक वर्षापासून राणे परिवारावर आहे. आई भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन निघाल्यावर शंभर टक्के यश मिळते असे राणे साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. तीनही राणे आज महत्त्वाच्या पदांवर आहेत. गावासाठी कधीही काहीही मागा, ते पूर्ण केले जाईल. आंगणे कुटुंबीयांनी इतकी वर्ष राणे साहेब,पालकमंत्री नितेश राणे, व आमदार म्हणून माझ्यावर प्रेम केले आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. येथील आरसीसी टाकी पूर्ण झाल्यानंतर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आंगणेवाडी मध्ये जिओ टॉवर होण्याबाबत शंभर टक्के काम पूर्ण करण्यात येईल असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी आंगणेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी केले. खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या सूचनेवरून जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आंगणेवाडी येथे पाऊस पाणी संकलन करणे व आरसीसी टाकी बांधणे या सुमारे 40 लाख रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. आंगणेवाडी येथील सुचवण्यात येणारी विकास कामे शंभर टक्के पूर्ण केली जातील. राणे कुटुंब नियमित सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यरत आहे असे आमदार निलेश राणे म्हणाले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी श्री भराडी देवी मंदिर येथे आईचे आशीर्वाद घेतले. आंगणे कुटुंबीयांच्या वतीने आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी स्वागत करत सत्कार केला. बाबू आंगणे यांनी प्रस्ताविक करताना विकास कामाला निधी उपलब्ध केल्याबद्दल राणे कुटुंबीयांचे आभार मानले. तसेच आंगणेवाडी येथे जिओ टॉवर आणि इतर विकास कामांबाबत आपल्या प्रस्ताविकात मागणी केली.

यावेळी मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण,पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, मंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर आंगणे, ग्रामपंचायत अधिकारी युगल प्रभूगावकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मालवणचे उप अभियंता प्रवीणकुमार गायकवाड, कनिष्ठ अभियंता शुभम दाभाडे, ठेकेदार डिचवलकर, मसूरे पोलीस संजय हुंबे, तुषार वाघाटे, पोलीस पाटील पंकज आंगणे, सतीश आंगणे, भरत आंगणे, राजेश गावकर, जितेंद्र परब, बाबल आंगणे, जयवंत आंगणे, तुषार आंगणे, तनुराज आंगणे, सचिन आंगणे, गणेश आंगणे, रघुनाथ आंगणे, दिनेश आंगणे, गौरव आंगणे, रुपेश आंगणे, रोहित आंगणे, प्रथमेश आंगणे, तन्मय आंगणे, पुरुषोत्तम शिंगरे आदी आंगणे कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार बाबू आंगणे यांनी मानले.