साळशी नं. १ प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

शिरगाव (प्रतिनिधी )   देवगड तालुक्यातील केंद्र शाळा साळशी नं. १ या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रशालेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पाचवी ते सातवी या वर्गातील वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या, तसेच गणित व इंग्लिश विषयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यामध्ये देवयानी बागवे (इ. सातवी, प्रथम क्रमांक ), तसेच रुद्र आचरेकर (सहावी व इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक), रुतिका साटम (इ. पाचवी मध्ये प्रथम क्रमांक, गणित विषयात प्रथम क्रमांक),लक्ष्मी गावकर (इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक) गौरी नाईक( इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक ), मानसी परब( गणित विषयात प्रथम क्रमांक ), भूषण देवणे (गणित विषयात प्रथम क्रमांक) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

ही बक्षिसे यशवंत आप्पाशेट माळवदे यांजकडून (आई लक्ष्मीबाई आप्पाशेट माळवदे यांच्या स्मरणार्थ), श्रीम. पदमावती पुरुषोत्तम पालयेकर यांजकडून (वडील आत्माराम व काका लक्ष्मण देवू साळसकर यांच्या स्मरणार्थ), तसेच ॲड. बी. एस. गावकर या शिक्षणप्रेमींनी या प्रशालेला दिलेल्या कायमस्वरूपी ठेव रकमेतून रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांचाहि सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच वैशाली सुतार यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या सत्कार सोहळ्यास सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच पांडुरंग मिराशी, ग्रामपंचायत सदयस कैलास गावकर, विशाखा साळसकर, अदिती रावले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश गावकर,शिरगांव पंचायत समिती सदयस शीतल तावडे,सुनील गावकर, सत्यवान सावंत,जयसिंग गावकर,पोलीस पाटील कामिनी नाईक, मुख्याध्यापक प्रकाश झाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कोदले यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रकाश झाडे यांनी मानले. यानंतर मुलांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.