गुहागर प्रतिनिधी:
बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर पेवे विभाग क्र.2 अंतर्गत शाखा क्र.20 मौजे गाव पवारसाखरी आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हास्तरीय भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा दिनांक28/04/2026 रोजी रात्रौ.10 वाजता पवारसाखरी अतिशय उत्साहात पार पडली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रो कबड्डी स्टार मा. शुभम शिंदे यांची उपस्थिती लाभली मा. महेश शिंदे (कबड्डी प्रशिक्षक) विशेष सहकार्य मा. विश्वास पवार( ग्रामपंचायत अधिकारी) उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष सहकार्य केले ते मा. संतोष लक्ष्मण जैतापकर गुहागर तालुक्यातील जनसामान्याचे नेतृत्व करणारे शिवसेना गुहागर तालुका समाजसेवक आणि संस्थापक निर्मल फाउंडेशन संचालित(रजि.) संतोष दादा जैतापकर वैद्यकीय मदत कक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे विशेष सहकार्य करणारे रिपब्लिकन सेना जिल्हा सरचिटणीस मा संदीपजी पवार साहेब यांची उपस्थिती लाभली. गुहागर तालुक्यातील
(हेदवी) गावचे सुपुत्र व संतोष दादा जैतापकर साहेब यांचे कट्टर समर्थक मा. आदेश यशवंत जाधव समाजसेवक रुग्णसेवक उपसचिव संतोष दादा जैतापकर वैद्यकीय मदत कक्ष. त्याचप्रमाणे मा. पराग कोळवणकर( शिवसेना विभाग प्रमुख गुहागर)मा. वैभव यशवंत पवार (शाखाप्रमुख शिवसेना) मा.पुरुषोत्तम कदम उपस्थित होते या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य युवा पिढीला कायम सहकार्य करणारे आणि निगुंडळ गावचे सुपुत्र मा.फैजान कापडी यांचे सहकार्य लाभले. मा वैभव जाधव अडूर मा. सुदर्शन मोहिते (नवनिर्वाचित अध्यक्ष पेवे विभाग क्र 2 मुंबई) मा. मनोज गमरे (पवारसाखरी शाखा माजी अध्यक्ष मुंबई) मा. राजेंद्र पंढरीनाथ मोहिते (जेतवन बुद्ध विहार समिती अध्यक्ष )मा. सौ सानवी सचिन पवार (वरवेली) सचिन महिंद्र मोहिते( पवारसाखरी शाखा अध्यक्ष मुंबई)मा. प्रशांत सदाशिव गमरे (मुंबई सेक्रेटरी) मा. किशोर संजय मोहिते( सहसेक्रेटरी मुंबई) आदींचे सहकार्य लाभले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक (ग्रुप) वाय डी ए ग्रुप चिपळूण यांनी मान पटकावला 15555 आकर्षक ट्रॉफी व सन्मान चिन्ह व मेडल द्वितीय क्रमांक ग्रुप ओम साई डान्स ग्रुप खेड यांनी मान पटकावला 11111 आकर्षक ट्रॉफी व सन्मान चिन्ह व मेडल
सिंगल (सोलो)
प्रथम क्रमांक शान महालदार (चिपळूण) याने मान पटकावला 7777 आकर्षक ट्रॉफी व सन्मान चिन्ह आणि मेडल
सिंगल (सोलो)
द्वितीय क्रमांक मृदुला धोपावकर (रत्नागिरी) हिने मान पटकावला 5555 आकर्षक ट्रॉफी सन्मान चिन्ह व मेडल
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहिद खेरटकर( शाहीर कवी निवेदक वक्ता पत्रकार) यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केले
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ कादंबरी प्रशांत वैद्य (खेड) यांची उपस्थिती लाभली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली ते मा. विश्वास विजय मोहिते (बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर माजी सचिव) त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी सहकार्य केलं ते विकास मोहिते प्रथमेश येलवे शुभम मोहिते यश मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले त्याचप्रमाणे इतर आयोजक संतोष मोहिते निलेश नागे संदेश मोहिते विशाल गमरे, रुपेश गमरे आशिष गमरे वैभव येलवे सागर नागे मनिष मोहिते आशिष चाफे आयुष नागे प्रतिक नागे साहिल मोहिते अतिशय सुंदर कार्यक्रम यशस्वी झाला रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक प्रतिभावंत स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला त्याबद्दल सर्व स्पर्धकांचे व रसिक माय बाप प्रेक्षकांचे आयोजकांकडून सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहेत.













