लांजा तालुक्यातील १६ माध्यमिक शाळांना सोलर पॅनेल चे वाटप

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वाटप

लांजा ( प्रतिनिधी): कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत लांजा तालुक्यातील १६ माध्यमिक शाळांना ‘सोलर पॅनेल’चे नुकतेच वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीतून माध्यमिक शाळांना सोलर पॅनेल वाटप करण्यात आले. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल लांजा, रुक्मिणी भास्कर विद्यालय, व्हेळ, नवलादेवी विद्यामंदिर खानवली, बॅ. नाथ पै विद्यालय हर्चे, रा.
सी. बेर्डे विद्यालय सापुचेतळे, आदर्श विद्यामंदिर प्रभानवली, आदिष्टी विद्यामंदिर गोविळ, श्रीराम विद्यालय वेरवली, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालय तळवडे, आदर्श विद्यामंदिर देवधे, न्यू इंग्लिश स्कूल पुनस, प्रतापराव माने विद्यालय भांबेड, सरस्वती विद्यानिकेतन खावडी, कै रा.सी. बेर्ड विद्यालय साटवली, अल अमीन उर्दू हायस्कूल लांजा यांचा समावेश आहे.
दरम्यान, यावेळी भाजपचे लांजा दक्षिण मंडल अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर व उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले उपस्थित होते.