बुधवारी १३ मे रोजी लांजा येथे पालकमंत्री उदय सामंत यांचा जनता दरबाराचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी): राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार बुधवारी १३ मे रोजी रोजी दुपारी ३ वाजता शहरातील अजिंक्य मंगल कार्यालय येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांनी दिली.
गेल्या तीन-चार वर्षात तालुक्याची आमसभा देखील झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झालेले नाही. म्हणूनच पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात लोकांना आपले प्रश्न, समस्या मांडता येणार आहेत.
तरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी व समस्या मांडण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या जनता दरबाराला उपस्थित राहण्याचे आवाहन लांजा तहसीलदार प्रियंका ढोले यांनी केले आहे.