सावंतवाडी | प्रतिनिधी :
मळगाव-सावळवाडा येथील रहिवासी आणि सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष बळवंत जनार्दन मसुरकर (७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
नवी मुंबईतील थ्री स्टार इंजिनीअरिंग कंपनीतून फोरमन इंजिनीअर पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या मूळ गावी मळगाव येथे स्थायिक झाले होते. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. विशेषतः, सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, दोन भाऊ, पुतणे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सिव्हिल इंजिनीअर महेश मसुरकर आणि ठाणे येथील पर्सेटीव्ह टेक्नॉलॉजीचे हरीश मसुरकर यांचे ते वडील तर श्रीधर आणि सुनील मसुरकर यांचे ते बंधू होत.













