लांजा: विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील संधींची ओळख करून देण्यासाठी ‘नवतरुण विकास मंडळ’ मौजे रुण गोंधवली वाडी, मुंबई ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी १० मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत एका विशेष विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
चला स्वप्न साकार करूया” हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने रविवारी १० मे रोजी या विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लांजा तहसीलदार
श्रीमती प्रियांका ढोले या उपस्थित राहणार असून
त्या स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय क्षेत्रातील करिअरच्या संधींवर प्रकाश टाकतील. अश्वनाथ बाप्पाजी खेडकर: (पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी) – पोलीस दल आणि संरक्षण क्षेत्रातील आव्हाने व संधींबाबत मार्गदर्शन करतील. तर शिवाजी गाढवे: (जि. प. प्रा. शिक्षक, लांजा) हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित मार्गदर्शन करतील.
Home महत्वाच्या बातम्या रुण गोंधवली वाडी येथे रविवारी १० मे रोजी ‘विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा’













