फटाके फोडत, लाडू भरवत यशाचा आनंद साजरा
कणकवली : दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन करत उत्तीर्ण झालेल्या कणकवली शहरातील विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर होताच एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांनी फटाके फोडत तसेच एकमेकांना लाडू भरवत आपल्या यशाचा आनंद साजरा केला. शहरातील विविध ठिकाणी आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पालक, शिक्षक व मित्रपरिवाराने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












