सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश
शिरगाव (वार्ताहर) : देवगड तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे या केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य विभागाच्या ऑनलाईन कामकाजासाठी कुवळे येथून शिरगावला जावे लागत असे या समस्यांबाबत कुवळे- रेंबवली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुभाष कदम,उपसरपंच श्री.प्रदोष प्रभूदेसाई, ग्रा.प सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर,सुहास राणे,सौ प्रणया मालणकर, सौ उर्मिला परब,सौ.रोहिणी लाड,सौ.सानिका म्हणयारे आणि बूथ प्रमुख श्री.अजित घाडी यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे संगणक संचासाठी मागणी करुन पाठपुरावा केला व आमदार नितेश राणे यानी येथील गैरसोय ओळखून स्व:निधीतूून आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला संगणक संच आणि प्रिंटर भेट दिला व त्याचे सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते आणि कुवळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला प्रदान करण्यात आला यावेळी सरपंच सुभाष कदम यांनी आमदार नितेश राणे साहेबांचे आभार मानले. तसेच आम्ही आमदार नितेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे वक्तव्य केले तसेच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी, आरोग्यवर्धिनी केंद्र च्या समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनीही आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.
याप्रसंगी मा. सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, बुथप्रमुख, तसेच आरोग्य अधिकारी डाॅ.पुजा सांळुंखे , परिचारिका सौ.पावस्कर, परिचारिका सौ.तावडे , आशा स्वयंसेविका सौ.रश्मी चिंदरकर,गटप्रवर्तक सौ.फाटक, मदतनीस सौ भावना कदम,ग्रापमपंच्यात संगणक ऑपरेटर वीरेश वळंजू ,भाजपा युवा प्रमुख कुवळे श्री.विनोद कुळेकर तसेच लक्ष्मण बागवे, निलेश घाडी,अनंत घाडी, सखाराम घाडी, रवी घाडी, उल्हास परब, विनायक कदम आणि महिला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
सोबत फोटो आहे.












