रत्नागिरी :
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष मोरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला. शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रयत्नातून आशिष मोरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत येण्याचा निर्णय निश्चित केला. त्यानुसार आज भाजप जिल्हा कार्यालयात आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
आशिष मोरे यांच्या या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मधील भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक मजबूत होणार आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, ओंकार फडके, दादा ढेकणे, संदीप सुर्वे यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.













