गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील जानवळकरवाडी येथील श्री साई मंदिराचा 28 वा वर्धापन दिन उद्या शुक्रवार दिनांक 22 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
यावेळी सकाळी आठ वाजता श्री साई मूर्तीला विधीवत अभिषेक,सकाळी 10 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद,आरती दुपारी 12 ते 1 कमलाकर वनगे यांचे कीर्तन दुपारी 1 वाजता साई भंडारा महाप्रसाद, रात्री 8 वाजता आरती,रात्री 9 वाजता दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे मधली वाडी यांचे भजन होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमांना साई भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.












