जिल्ह्यात मनाई आदेश लागू

जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी दु.12.00 वाजल्यापासून ते दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.

             जिल्ह्यात दि.15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी, दि. 16 ऑगस्ट 2023 रोजी पारसी न्यू ईयर, दिनांक 17 ऑगस्ट रोजी श्रावण मासारंभ दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी नागपंचमी सण, उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरे करण्यात येणार आहेत.

              यापूर्वी राज्यात सण, उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष  व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे  पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच  राज्यातील सध्याची राजकिय परिस्थिती पाहता काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असून काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धा गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष्य करत असुन त्यातून काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

               जिल्ह्यात आगामी होणारे सण, उत्सव निमित्ताने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच सध्याची राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यात होणारी उपोषणे,निदर्शने, मोर्चा, रास्तारोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेच प्रश्न निर्माण होवून जिल्ह्यात  कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

  कलम 37 (1) नुसार

Ø                 शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.

Ø                 अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.

Ø  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.

Ø                 व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)

Ø                 सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.

Ø                 सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3) नुसार

Ø                सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.

Ø  हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.