ओटवणे (प्रतिनिधी )मंगळवारी ओटवणे कापईवाडी येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला त्या घटनेत सरमळे येथील महीलेला आपला जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत पुनः एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाल.या झालेल्या अपघातात वाहन चालकांची जरी चूक असली तरी यात सार्वजनिक बांधकाम खात्याचाही बेजबाबदार पणा ही तेवढाच कारणीभूत असल्याचा थेट आरोप ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांनी केला आहे. कारण या रस्त्यावर ठीक ठिकाणी तसेच वळणावर झाडी वाढलेली असून पूर्णतः रस्त्यावर आलेली आहे.त्यातच रस्ता अरुंद असल्याने दोन गाड्या जाण्या साठीही इथं कसरत करावी लागते.यावर उपाय योजना करणे गरजेचा आहे पण तसे प्रयत्न होताना संभंधित खात्याकडून दिसत नाहीत.त्यामुळे झालेल्या अपघाता नंतर ओटवणे येथील काही युवक एकत्र येत त्यांनी या वळणावरील झाडी तोडून तसेच जे. सी बी. च्या मदतीने रस्त्याच्या बाजूला असणारा उंचवटा हटवत हा अपघाताचा स्पॉट व्यवस्थित केला.हा भीषण अपघात घडल्यानंतर एक हसत खेळत कुटुंब उध्वस्त झालं मात्र याच सोयर सुतक नसलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आपली जबादारी काय याचीही जाणीव नसलेल्या या यंत्रणेला या अपघाता नंतर तरी जाग यावी अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत. या भागात अनेक ठिकाणी झाडी वाढली आहे.रस्त्यावर झाडे कधीही पडतील अशा अवस्थेत आहेत. पावसाळ्यापूर्वी किमान धोकादायक झाडे तसेच झाडी तोडणे तेवढं तरी काम कराव एवढीच अपेक्षा वाहन चालकामधून व्यक्त होत आहे.या श्रमदानासाठी निलेश माटेकर, सत्यवान गावकर, किरण गावकर, प्रमोद गावकर, जयगणेश गावकर,सरपंच आत्माराम गावकर, सगुण गावकर, पोलीस पाटील शेखर गावकर, रवींद्र म्हापसेकर, राजाराम तावडे,यांनी विशेष सहकार्य केले.वाहन चालकांमधून याचे समाधान व्यक्त केले जात आहे.











