मंडणगड रिपाइं चा जाहीर पाठिंबा
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील पोसरे येथील दरड ग्रस्ता चे अद्यापि पुनर्वसन न झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ स्वातंत्र्य दिनी छेडण्यात येणाऱ्या आंदोलनावर ठाम असून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे मंडणगड रिपाइं ने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे
२२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळुन सुमारे १७ लोक दगावले होते व घरे दरडीखाली गेल्याने सुमारे ९ कुटुंबिय बेघर झालेली आहेत. दोन वर्षे होवुनही संबंधित बाधित कुटुंबातील लोक स्वत:च्या
घराशिवाय व पुर्नवसना शिवाय दयनिय अवस्थेत आश्रीतांचे वनिर्वासितांचे जिवन जगत आहेत. त्यांचे पुनर्वसन व्हावे या करिता प्रशासना कडून आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्यापि हा प्रश्न सोडवला न गेल्याने दरड ग्रस्त वंचीताचे जीवन जगण्या ची वेळ येऊन ठेपल्याने खेड तालुका बौद्ध समाज सेवा
संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडन्याचा इशारा येथील प्रांताधिकारी यांना देण्यात आला होता मात्र प्रशासनाने त्या पत्राची दखल न घेतली गेल्याने तालुका संघ आपल्या आंदोलना च्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे










