वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस यांचा प्रामाणिकपणा

माकडाने पळविलेली दागिन्यांची डबी पर्यटकाला मिळवून दिली परत

सिंधुदुर्ग: आंबोली धबधब्यानजिक एका पर्यटकाच्या कार मध्ये ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची डबी माकडाने पळविली . जंगल भागात नेऊन टाकलेली ती डबी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस यांनी शोधून काढून त्या कर्नाटक येथील पर्यटकांच्या स्वाधीन केली.
माकडाने पळविलेली दागिन्यांची डबी पर्यटकाने शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती डबी त्यांना सापडली नाही.अखेर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना ती डबी डबी नजिकच्या जंगलमय भागात सापडली.परंतु त्यात सोन्याची ४० हजार रुपये किमतीची अंगठी नव्हती.गवस यांनी ती डबी त्या कर्नाटक येथील पर्यटकांच्या स्वाधीन केली..त्या पर्यटकांनी श्री.गवस यांचे आभार मानले. सिंधुदुर्ग पोलिसांच्या प्रामाणिक कर्त्यव्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस दलास त्यांनी धन्यवाद दिले.